आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणेः फेसबुकवर जुळले प्रेमसंबंध, लग्न करण्यासाठी दिली शाळकरी मुलीच्या अपहरणाची धमकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील प्रेमी युगुलाने लग्न करण्यासाठी १२ वर्षांच्या मुलीचा अपहरणाचा डाव रचला. त्यानंतर मुलीच्या वडिलांना फाेन करून ४० लाख रुपये खंडणीची मागणी केली. मात्र, मुलीच्या वडिलांनी याबाबत तक्रार करताच पोलिसांनी या बनावाचा पर्दाफाश केला. टीव्हीवरील “सावधान इंडिया’ ही मालिका पाहून युगुलाने हे कृत्य केल्याची कबूली दिली.

२१ वर्षीय तरुणी व तिचा प्रियकर मतीन शेख (२२, रा. सुखसागरनगर) यांना पाेलिसांनी अटक केली अाहे. याबाबत इम्रान उस्मान शेख यांनी िफर्याद िदली अाहे. इम्रान शेख हे मार्केट यार्ड परिसरात कर सल्लागाराचे काम करतात. २८ जानेवारी राेजी एका व्यक्तीने त्यांना फोन करून “४० लाख रुपये दे, अन्यथा तुझ्या मुलीचे अपहरण करू’, अशी धमकी दिली. त्यामुळे इम्रान यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. चौकशीत मोबाइलवर आलेला फोन क्रमांक हा इम्रान यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीच्या मुलीचा असल्याचे स्पष्ट झाले. तसेच ती दोन दिवसांपासून गायब असल्याचे मोलकरणीने सांगितले. गुरुवारी आरोपी तरुणी पोलिसांना मार्केट यार्ड परिसरात आढळली. पोलिसांनी तिची अधिक चौकशी केली असता तिने आपलेच अपहरण झाल्याचा बनाव पोलिसांसमोर मांडला. प्रत्यक्षात दोघांनी इम्रान यांच्या मुलीचे अपहरण न करता पैसे उकळण्याचा प्रयत्न केला, अशी  माहिती पोलिसांनी दिली.   

फेसबुकवर जुळले दोघांचे सूत
२१ वर्षीय तरुणी बीएस्सीत शिक्षण घेते. मतीन शेख हा बीसीएसच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेण्याबराेबरच माेबाइल दुरुस्तीचे काम करतो. दीड वर्षापूर्वी दोघांची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. प्रेमसंबंध जुळाल्याने दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुलीने आपल्या  आईकडून ६० हजार रुपये घेऊन लग्न केले होते. त्यानंतर आई मतीनकडे पैशांची मागणी करत होती. त्यामुळे दोघांनी सावधान इंडिया पाहून १२ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा बनाव रचून ४० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...