आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यातून पळून आलेल्या प्रेमीयुगुलाची इंद्रायणीच्या काठावर विष प्राशन करून आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेमीयुगुल - Divya Marathi
प्रेमीयुगुल
पुणे- धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील डाेंगुर्ण गावातील प्रेमीयुगुलाने पुणे जिल्ह्यातील अाळंदीत येऊन इंद्रायणी नदीकाठी विष प्राशन करून अात्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. राहुल साहेबराव पाटील (३५) व रिना ऊर्फ गुड्डी विलास गिरीगाेसावी (२५) अशी मृतांची नावे आहेत.  याबाबत अाळंदी पाेलिस ठाण्यात बाबू अर्नाळे (रा. अाळंदी, पुणे) यांनी फिर्याद दिली अाहे. 

बाबू अर्नाळे हे इंद्रायणी नदीजवळ सुरक्षा रक्षकाचे काम करतात. शुक्रवारी दुपारी ते गाेपाळपुरा येथील इंद्रायणी नदी पुलाखालील झुडपाजवळ फिरत होते. त्या वेळी त्यांना एक पुरुष व महिलेचा मृतदेह दिसला. त्यांनी याबाबत तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले.  मृतदेहाशेजारी विषारी औषधाची बाटली सापडली आहे. तरुणाच्या खिशात सापडलेल्या  मोबाइलच्या आधारे मृतांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, प्रेमास विरोध झाल्याने त्यांनी  आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी  वर्तवला आहे.
 
रिनाने आत्महत्या करण्‍यापूर्वी केला होता नातेवाइकांना फोन...
राहुल आणि रिना मागील चार दिवसांपूर्वी धुळे येथून पळून आले होते. विष प्राशन करण्‍यापूर्वी तिने नातेवाइकांना फोन केला होता. आत्महत्या करणार असल्याचेही तिने त्यांना सांगितले होते. रिनाचे नातेवाइक धुळेहून आळंदीकडे रवाना झाले आहेत.

घटनेशी संबंधित फोटो पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा.. व्हिडिओ शेवटच्या स्लाइडवर...
बातम्या आणखी आहेत...