आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ह्या आहेत कर्नल पुरोहितच्या पत्नी, मांडले 9 वर्षांच्या संघर्षाचे कथानक...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्नल पुरोहित आणि पत्नी अपर्णा... - Divya Marathi
कर्नल पुरोहित आणि पत्नी अपर्णा...
पुणे - मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल श्रीकांत पुरोहितला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर पुरोहित कुटुंबियांत उत्सवाचे वातावरण आहे. शेजारच्या मंडळी आणि नातेवाईक त्यांच्या घरी येऊन शुभेच्छा देत आहेत. पुण्यातील येरवडा परिसरात पुरोहितचे वडिलोपार्जित घर आहे. या घरात आई आणि पत्नीसह दोन मुले राहतात. गेल्या 9 वर्षांत झालेला संघर्ष पत्नी आणि कुटुंबियांसह शेजाऱ्यांनी सुद्धा मांडला आहे. 
 

जे काही केले ते देशासाठी - शेजारी
- पुरोहित कुटुंबियांचे शेजारी भाग्यश्री हार्डिकर यांनी सांगितल्याप्रमाणे, त्या पुरोहित परिवाराला 30 वर्षांपासून ओळखतात. कर्नल पुरोहितची निर्दोष सुटका होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुरोहित कुटुंबियांचा व्यवहार आपल्यासोबत खूप चांगला होता असेही त्या पुढे म्हणाल्या. 
- कर्नल पुरोहितच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आणखी एक शेजारी कमल हार्डिकर म्हणाले, "पुरोहितने जे काही केले ते देशासाठी केले. तरीही त्यांच्या नावावर राजकारण करण्यात आले. ते असे कधीच करू शकत नाही. मी त्यांना बालपणीपासून ओळखतो ते असे कधीच करू शकत नाही. नेहमीच इतरांच्या मदतीसाठी धावून येणाऱ्या पुरोहितला आधीच जामीन मिळायला हवा होता."
- येरवड्यातील पुरोहित कुटुंबियांच्या घराचे नाव सुस्मृती असे असून ते पुरोहितच्या वडिलांनी बांधले होते. 
 

पत्नीला सोडावा लागला डॉक्टर पेशा
- कर्नल पुरोहितच्या पत्नी अपर्णा पुरोहित डॉक्टर आहेत. त्या आपल्या दोन मुलांसह पुण्यातील बंगल्यात राहतात. 
- पतीला जामीन मिळाल्यानंतर अपर्णा पुरोहित म्हणाल्या, "अखेर माझ्या पतीला जामीन मिळाला. हा माझ्यासाठी खूप मोठा दिलासा आहे. 9 वर्षांच्या संघर्षांनंतर ते घरी येत आहेत. ते आता आमच्यासोबत आमच्या घरी राहणार आहेत. तरीही, आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे."
- "कोर्टाच्या प्रत्येक सुनावणीला मी प्रत्यक्ष हजर होते. जामीनावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याचीच मला भिती होती. आरोप पत्रात त्यांचे नाव आल्यानंतर माझ्यासह समस्त कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला होता. यातून सावरण्यासाठी आम्हाला खूप वर्षे लागली आहेत."
- "माझे कुटुंबच माझी ताकद आहे. त्यावेळी आम्ही जबाबदाऱ्या वाटून घेतल्या होत्या. खटल्यांमध्ये मी लक्ष घातले होते. माझ्या सासूंनी घर सांभाळले होते. माझ्या ननदांनी आमचा खर्च उचलला. या खटल्यामुळे मला डॉक्टरी पेशा सोडावा लागला आहे."
बातम्या आणखी आहेत...