आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर व-हाडी बसला भीषण अपघात; 2 ठार, तर 15 जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर आज सकाळी साडे आठच्या सुमारास पुण्याहून मुंबईकडे चाललेली खासगी लक्झरी बसला भीषण अपघात झाला. बोरघाटात खोपोली एक्झिट व आडोशी बोगद्याच्या दरम्यान वेगाने चाललेली ही बस डिव्हाडरला धडकली. यात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 15 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना पनवेलतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, बसमधील प्रवासी काचेच्या खिडकीतून बाहेर फेकले गेले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही खासगी बस कर्नाटकमधील आहे. ही बस आज पहाटे पुण्यातून मुंबईकडे चालली होती. सकाळी साडेआठच्या सुमारास ही बस बोरघाटातून चालली होती. खोपोली एक्झिट व आडोशी बोगद्याच्यादरम्यान ही बस डिव्हाडरवर चढली. डिव्हाडरचा कठडा तोडून ही बस पुढे गेली. बस वेगाने चालली होती व आतील प्रवासी लांबचा प्रवास करीत असल्याने झोपले होते. काही कळायच्या आतच हे 15-20 प्रवासी काचेच्या खिडकीतून तुटून बाहेर फेकले गेले. यात जागीच दोन ठार झाले. तर आणखी तीन-चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. या घटनेत 12 ते 15 जण जखमी झाले आहेत. जखमींवर पनवेलमधील खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. या बसमध्ये 40-45 लोक होते. ते कर्नाटकमधील असून, मुंबईला एका लग्नसमारंभासाठी चालले होते.
बातम्या आणखी आहेत...