आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lyrics Anand Wrong Song Screed In PIFFA, Tawde Point Out Mistake

कल्याणजी-आनंदजींच्या गाण्यात'बप्पीं'ना घुसडले, ‘पिफ’च्या संयोजकांची चूक तावडेंनी पकडली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - संगीतकार आनंदजी यांच्या योगदानाचा आढावा घेणा-या चित्रफितीत पिफच्या संयोजकांनी चक्क ‘के पग घुंगरू बांधे, मीरा नाची थी’ हे बप्पी लाहिरींचे गाणे दाखवून गोंधळ घातला. परंतु सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ही चूक लक्षात आणून देत संयोजकांची पंचाईत केली. तावडेंनी घेतलेल्या या ‘फिरकी’मुळे व्यासपीठावरील ‘पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल यांच्यासह अनेकांची अडचण झाली. ‘पिफ’च्या सांगता समारंभात विनोद तावडे प्रमुख पाहुणे होते. संगीतकार आनंदजी यांना एस. डी. बर्मन स्मृती गौरव पुरस्कार देण्यापूर्वी त्यांच्या गाजलेल्या गीतांचा ‘मिडले’ सादर करण्यात आला. त्यात हा घोळ झाला. पिफच्या उद्घाटनाला मी आलो तेव्हा व्यासपीठावर कलावंतांपेक्षा राजकीय व्यक्तीच अधिक होत्या.
मी त्याचा उल्लेखही केला होता. पुढच्या वर्षी व्यासपीठावर राजकीय व्यक्ती दिसल्या तर महोत्सवाला शासनाकडून एक दमडीही मिळणार नाही, अशा कडक शब्दांत तावडे यांनी पिफचे व्यासपीठ कलाकारांचे असावे, असे सुचवले.

एलिझाबेथ एकादशी, किल्ला चित्रपटांची पुरस्कारांत बाजी
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) परेश मोकाशीच्या ‘एलिझाबेथ एकादशी’ आणि अविनाश अरुण दिग्दर्शित ‘किल्ला’ या दोन मराठी चित्रपटांनी बाजी मारत महाराष्ट्र शासनाचा संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकावला.

पिफमध्ये प्रथमच पहिल्या क्रमांकाचे पुरस्कार विभागून गेल्याने सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक यांना मिळणारी अनुक्रमे १० लाख व ५ लाख रुपयांची पुरस्कार रक्कमही विभागली गेली. जागतिक स्पर्धा विभागात क्युबाच्या ‘बिहेविअर’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवला.

हे ठरले मानकरी : * महाराष्ट्र शासन प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट (१० लाख रु,) – बिहेविअर (क्युबा) *महाराष्ट्र
शासन सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक (पाच लाख रुपये) – इर्नेस्टो दर्नाज * संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी
चित्रपट (५ लाख रुपये) – एलिझाबेथ एकादशी आणि किल्ला
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडून पुरस्कार
* सर्वोत्कृष्ट अभिनेता, दिग्दर्शक (प्रत्येकी २५ हजार रुपये – अनुक्रमे) उषा नाईक (एक हजाराची नोट), भाऊराव क-हाडे
(खवडा).