आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maanayata To Surprise Sanjay Dutt On His Birthday In Prison

संजयसाठी मान्यताने ठेवला रोजा, वाढदिवसानिमित देणार स्पेशल गिफ्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - येथील येरवडा कारागृहामध्ये अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याचा 29 जुलै रोजी 54 वा वाढदिवस आहे. कारागृहामध्ये वाढदिवस साजरा करण्याची ही संजयची दुसरी वेळ आहे. याआधी 2007 मध्ये त्याने कारागृहात वाढदिवस साजरा केला होता.

काही दिवासांपूर्वी संजयने पत्नी मान्यताला तिच्या वाढदिवसानिमित्त सरप्राइज गिफ्ट दिले होते. त्याने स्वतः लिहिलेली एक कविता गुलाबपुष्पासह तिला भेट दिली होती. आता मान्यताही संजयला त्याच्या वाढदिवसानिमित्त स्पेशल गिफ्ट देणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजयसाठी मान्यताने रोजा ठेवला आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या मान्यता कोणते स्पेशल गिफ्ट संजयला देणारेय....