आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Macdonald's No Complaint On Poor Child No Entry Incident

गरीब मुलाला हाकल्याप्रकरणी मॅकडोनाल्डची तक्रार नाही, तडजोडीवर भर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुण्यातील मॅकडोनाल्ड फास्टफूड आऊटलेटमध्ये गरीब मुलाला हाकलून देण्याच्या घटनेनंतर दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या चिखल-शेणाच्या मा-यावर मॅकडोनाल्ड प्रशासनाने रविवारी सायंकाळपर्यंत पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे पोलिस कारवाईची अथवा गुन्हा नोंदवण्यात अालेला नाही. दरम्यान, मॅकडोनाल्डच्या वतीने प्रकरण मिटवण्यावर भर देण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच मॅकडोनाल्डच्या सुरक्षा रक्षकाला निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळाली.

दलित पँथरचे समर्थन : मॅकडोनाल्ड आऊटलेटवर केलेल्या आंदोलनाचे दलित पँथर संघटनेने समर्थन केले आहे. १७ जानेवारीला संघटनेने पोलिस आयुक्तांकडे संबंधितांना अटक करावी, अशी मागणी केली होती. पण सायंकाळपर्यंत कारवाई झालेली नव्हती.