आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Madha Loksabha Seats Conflicts Between Raju Sheety & Mahadev Jankar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीसह महायुतीसाठीही माढा ठरतोय तिढा, जानकर-शेट्टी वाद उफाळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या माढा लोकसभा मतदारसंघात सध्या उमेदवारीवरून वाद उफाळला आहे. राष्ट्रवादीत तिकीट मिळविण्यावरून पक्षातंर्गत वाद विकोपाला गेला आहे तर, महायुतीतही काही आलबेल चालले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पवारांचा उत्तराधिकारी ठरविणारा हा लोकसभा मतदारसंघ 'माढा' नव्हे तर 'तिढा' ठरण्याची शक्यता आहे.
महायुतीत डेरेदाखल झालेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकरांनी माढ्यावर आपलाच नैसर्गिक हक्क असल्याचे असल्याचे सांगत राजू शेट्टींच्या स्वाभिमान शेतकरी संघटनेला सोडला तर आपण तडक महायुतीतून बाहेर पडू, असा इशारा दिला आहे. दुसरीकडे, राजू शेट्टींना माढ्यातून सदाभाऊ खोत यांना उमेदवारी द्यायची आहे. त्यासाठी शेट्टींनी मुंडे-उद्धव यांच्याकडे माढ्याची जागा सोडण्याची मागणी केली आहे. त्यामुळे खवळलेल्या जानकर यांनी महायुती सोडण्याचा इशारा दिला आहे. आपण शरद पवारांच्या विरोधात गेल्या लोकसभेलाही लढतो होते. आपले मूळ गाव माढा मतदारसंघात येते त्यामुळे या मतदारसंघावर माझा नैसर्गिक हक्क आहे असे जानकरांचे म्हणणे आहे. तर, गेली दोन वर्षे राष्ट्रवादीची मस्ती उतरविण्यासाठी स्वाभिमानी तयारी करीत असल्याचे शेट्टींचे म्हणणे आहे. त्यामुळे शेट्टी-जानकर वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. या दोघांत वाद पुढे येताच रामदास आठवलेंनी ही जागा आरपीआयला द्यावी, असे सांगत फोडणी दिली आहे.
पुढे वाचा, राष्ट्रवादीतील सत्तासंघर्षाचा वाद...