आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलनाचे २५ लाख दुष्काळग्रस्तांसाठी वापरा : भंडारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- साहित्य संमेलनासाठी सरकारकडून देण्यात येणारे २५ लाख उधळपट्टी करण्याऐवजी दुष्काळग्रस्तांसाठी वापरावेत, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी येथे शनिवारी मांडले.
पिंपरी येथे होणाऱ्या ८९ व्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या पंतप्रधान मोदी यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा पक्ष निषेध करत आहे. खासदार अमर साबळे यांनी मांडलेल्या भावना या वैयक्तिक नाहीत, हीच भावना शेकडो पक्ष कार्यकर्त्यांची आहे आणि त्यामुळे सबनीसांच्या या विधानांचा पक्ष निषेध करत आहे, असे भंडारी म्हणाले.

साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार २५ लाख रुपये देते. ते पैसे उधळपट्टीऐवजी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरावेत. या संमेलनासाठी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री गडकरी, जावडेकर, राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे येणार का, या प्रश्नावर मात्र भंडारी यांनी मौन बाळगणे पसंत केले. संमेलनाचे व्यासपीठ सर्व विषयांसाठी आहे. त्यात राजकारणही आलेच. यापूर्वी दुर्गाबाई भागवत, यांनीही या व्यासपीठावरून राजकीय स्वरूपाची भूमिका मांडल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...