आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांच्या पत्नी माधुरी देशमुख यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज ऊर्फ उदयसिंग देशमुख यांच्या पत्नी माधुरी उदयसिंग देशमुख (45) यांचे पुण्यात वानवडी येथे निधन झाले. शनिवारी सकाळी माधुरी यांना छातीत अचानक त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
भय्यूजी महाराज व माधुरी यांना एक मुलगी आहे. सध्या ती पुण्यामध्ये शिक्षण घेत असून इयत्ता दहावीत आहे. तिचा अभ्यास घेण्याकरीता माधुरी या पुण्यामध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांना शनिवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने हडपसरमधील नोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे त्यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

भैय्यू महाराज हे तत्काळ इंदौरवरून पुण्याकडे रवाना झाले आहेत. माधुरी यांच्या पार्थिवावर सोमवारी इंदौर येथे अंतिम संस्कार होण्याची शक्यता आहे. निधनाचे वृत्त समजताच भैय्यू महाराजांच्या अनेक भक्तांनी रुग्णालयात गर्दी केली होती.