आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mahabaleshwar Enviornment Action Plan Awaits Government Approval

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पर्यावरण बचाव: महाबळेश्वरच्या प्लॅनला मंजुरीची प्रतीक्षा !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- महाबळेश्वर आणि पाचगणी या प्रसिद्ध गिरीस्थानांचा पर्यावरणविषयक उच्चस्तरीय निरीक्षण समिती अहवाल केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने स्वीकारला आहे. आता हा अहवाल राज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून अंतिम मान्यतेची प्रतीक्षा आहे.
महाबळेश्वर आणि पाचगणी ही दोन्ही गिरीस्थाने भूप्रदेश, निसर्गसंपदा, जैवविविधता आणि वनवैभवाने युक्त आहेत. आधुनिक जीवनशैलीने मानवनिर्मित हस्तक्षेपामुळे येथील पर्यावरणाची हानी होत आहे. पर्यटनाचा अतिरेकी ताण या गिरीस्थानांवर पडत असल्याने जैवसमतोल बिघडत चालला आहे. या पार्श्वभूमीवर तेथील पर्यावरणपूरक अहवालांसाठी आणि उपाययोजनांसाठी तीन समित्या नेमण्यात आल्या होत्या. त्यापैकी तिस-या उच्चस्तरीय निरीक्षण समितीचा अहवाल 31 जुलैला सादर करण्यात आला. समितीचे अध्यक्ष देवव्रत मेहता यांनी सांगितले की, पहिली समिती 2002 - 2005 दरम्यान जमशेद कांगा यांच्या अध्यक्षतेखाली नेमली होती. समितीच्या 14 बैठका झाल्या व प्रमुख प्रश्नांविषयीच्या सूचना व कार्यवाहीचे उपक्रम सुचवण्यात आले होते. त्यानंतर बहादूर यांच्या अध्यक्षतेखाली दुस-या समितीने 2008 ते 2010 दरम्यान काम केले. आमच्या समितीचा अहवाल केंद्रानेराज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. अहवालात लोकसहभागाला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले. स्थानिक नागरिक, संघटना, लोकप्रतिनिधी, शिक्षण संस्था, हॉटेल, शेतकरी, वाहनांचे मालक, अशा विविध घटकांशी वेळोवेळी संवाद साधून समितीने काम केले. समितीच्या 13 बेठका झाल्या. त्यानुसार समितीने अहवालातील सूचना तसेच उपक्रम ठरवले आहेत.

समितीचे प्रमुख उपक्रम, सूचना
- स्थानिक पर्यावरणप्रेमींची संघटना बांधणी
- विकास आराखड्यात बदल व सुधारणा सुचवल्या
- पर्यटन विभागाला मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली
- दळणवळणाचाही आराखडा सुचवला
- वेण्णा लेक संवर्धनासाठी विशेष सल्लागार समिती
- नदी आणि धरणफुटीची रेषा आखणी
- या रेषेआतील जमीन ही संवर्धनक्षेत्र म्हणून नोंदवणार
- पाचगणी पठारासंदर्भातील दोन्ही बाजूंमध्ये संवादाचा प्रयत्न
- महाबळेश्वर-पाचगणीच्या संवेदनशील क्षेत्राच्या आसपासचा परिसर बफर झोन
- या भागात 52 नैसर्गिक वारसा स्थळे नोंदवली