आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahabaleshwar, Matheran Discount For Sr. Citizen

महाबळेश्वर, गणपती पुळे, माथेरानला ज्येष्ठांसाठी सवलत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सुट्यांचे दिवस जवळ येत असतानाच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) महाबळेश्वर, माथेरान, गणपती पुळे अशा पर्यटनस्थळी ज्येष्ठ नागरिकांना 20 टक्के सवलतीच्या दरात निवास व्यवस्था उपलब्ध करून देणार आहे. एमटीडीसीच्या प्रादेशिक अधिकारी नयना बोंदार्डे-गुरव यांनी ही माहिती दिली.


ज्येष्ठ नागरिकांचा पर्यटनाकडे कल वाढावा, उतरत्या वयातही त्यांना कमी पैशात निसर्ग पाहण्याची संधी मिळावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. 65 वर्षे वयावरील भारतीयांना सवलत मिळेल. त्यासाठी आगाऊ आरक्षण आवश्यक राहील. आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स असा पुरावा आरक्षणावेळी सादर करावा लागेल. हरिहरेश्वर, तारकर्ली, वेळणेश्वर, ताडोबा, अजिंठा, भंडारदरा, माळशेज घाट, चिखलदरा, पानशेत, कार्ला आदी पर्यटन स्थळाच्या ठिकाणी पर्यटन महामंडळातर्फे ही सवलत देण्यात येणार असल्याच, बोंदार्ड यांनी जाहीर केले.

6 ते 14 वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांनाही महामंडळाने 20 टक्के सवलत देऊ केली आहे. मात्र शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या सहलीसाठीच ही सवलत मिळणार आहे. सवलतीनुसार पर्यटक संकुलातील खोलीत 4 विद्यार्थी राहू शकतील. जादा गाद्यांसाठी शुल्क आकारले जाणार नाही. उपाहारगृहात मात्र सवलत नसल्याचे त्यांनी सांगितले.