आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीची लाट : महाबळेश्वर गोठले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाबळेश्वर - राज्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे थंडीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महाबळेश्वरमध्येही गेल्या दोन दिवसांपासून पारा 1 ते 2 अंशांनी घसरला असून थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शनिवारी येथे किमान तापमान 9.5 अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले.

महाबळेश्वर आणि परिसरात गुरुवारपासूनच पारा खाली उतरण्यास सुरुवात झाली होती. शुक्रवारी प्रचंड गार वारे, ढगाळ वातावरण आणि वारा अशीच परिस्थिती दिवसभर होती. परिणामी शनिवारी तापमानात चांगलीच घसरण झाली. वेण्णोलेक जेटीवर स्ट्रॉबेरीच्या मळ्यांमध्ये व स्मृतिवनात गवतावर हिमकणांची चादर पसरलेली आढळून आली. शनिवारी हंगामातील सर्वाधिक हिमकण असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्याआधी 15 ते 21 डिसेंबरदरम्यान येथे हिमकण दिसून आले होते, तर थंडीचा विचार करता 15 व 16 फेब्रुवारीला 9.6 इतक्या तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर 18 जानेवारीचा (9.2 अंश) अपवाद वगळता शनिवारी पार्‍याने (9.5 अंश) नीचांकी पातळी नोंदवली.

किमान तापमान
औरंगाबाद 14.8, नाशिक 9, सोलापूर 16.5, नगर 9.8, जळगाव 12.7, अकोला 17.5, अमरावती 14.2, पुणे 8.9, सातारा 11.2, कोल्हापूर 15, महाबळेश्वर 9.5, सांगली 13.6, उस्मानाबाद 13.5, परभणी 16.1, नांदेड 18, बुलडाणा 16, चंद्रपूर 15.5, नागपूर 17.9, वर्धा 17.2, यवतमाळ 17 अंश सेल्सियस.