आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे शिवसेना शहरप्रमुखपदी चंद्रकांत मोकटे आणि महादेव बाबर, दोघांकडे संयुक्त जबाबदारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे शहर शिवसेना शहरप्रमुखपदी माजी आमदार महादेव बाबर आणि माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा आज मुंबईत करण्यात आली आहे. - Divya Marathi
पुणे शहर शिवसेना शहरप्रमुखपदी माजी आमदार महादेव बाबर आणि माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा आज मुंबईत करण्यात आली आहे.

मुंबई/पुणे- पुणे शहर शिवसेना शहरप्रमुखपदी माजी आमदार महादेव बाबर आणि माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोघांकडे शहराची संयुक्त जबाबदारी देताना चार-चार विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुणे उपशहरप्रमुखपदी किरण साळी यांची तर पुणे शहर शिवसेना सहसंपर्क प्रमुखपदाची जबाबदारी अजय भोसले व प्रशांत बधे या दोघांकडे सोपविण्यात आली आहे. याबाबतची घोषणा आज मुंबईत करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या पदाधिका-यांना या निवडीचे पत्र सोपवले.

 

महादेव बाबर यांच्याकडे त्यांचा गृह मतदारसंघ हडपसर, सोबतच वडगावशेरी, खडकवासला, कॅंटोन्मेंट या चार मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे तर, चंद्रकांत मोकाटे यांच्याकडे त्यांचा गृह मतदारसंघ कोथरूड, शिवाजीनगर, कसबा आणि पर्वती या चार मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

मागील दिवसापूर्वी शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख व माजी आमदार विनायक निम्हण यांनी जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती पक्षनेतृत्त्वाकडे केली होती. त्यानुसार आता बाबर आणि मोकाटे यांच्याकडे ही संयुक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...