बारामती - शरद पवार यांनी आरक्षणाच्या मुद्दय़ावरून मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाला उल्लू बनवू नये, असे आवाहन रासप नेते महादेव जानकर यांनी केले.
शरद पवार चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. असे असतानाही त्यांनी धनगर व मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्दय़ावरून आतापर्यंत उल्लू बनवले. राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असले तर कायद्याच्या कसोटीत टिकणारे आरक्षण द्यावे. कोणी न्यायालयात गेले तर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळू शकते. मी आरक्षण दिले, आता प्रकरण न्यायालयात आहे. मी काय करू, अशी भूमिका पवार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतील. ताटात भाकरी वाढायची मात्र भाजी द्यायची नाही. ही पवारांची जुनीच राजकीय चाल आहे, असे जानकर म्हणाले.