आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजित पवारांवर टीका करत जानकरांना खेद, ग्रामीण भागात रूढ शब्दच वापरल्याचे स्पष्टीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि बारामतीबद्दल भगवानगडाच्या पायथ्याशी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी गुरुवारी खेद व्यक्त केला. दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असलेल्या जानकरांनी गुरुवारी पत्रक काढून खेद व्यक्त केला. मात्र, थेट अजित पवार किंवा बारामतीकरांकडे दिलगिरी व्यक्त करण्याचे त्यांनी टाळले. एवढेच नव्हे, तर खेदपत्रातही सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करून पुन्हा त्यांनी अजित पवारांनाच डिवचले.
भावनिक आवाहन करत जानकरांनी खेदपत्राची सुरुवात केली. ‘खंडेरायाची शपथ, मी गरिबांचा प्रतिनिधी आहे. बलाढ्यांशी लढा देतो; पण संस्कृतीने गरीब नाही. मी कोणाला शिवी दिली नाही किंवा देत नाही. भ्रष्ट मार्गाने पैसे कमावणारे व त्यावर राज्य करणाऱ्यांना जो ग्रामीण रूढ शब्द आहे, तो वापरला. वाटल्यास सर्व शब्दकोशांत तपासावा. राजकारणात खिशात दमडी नसताना मी बलाढ्य शक्तींना पुरून उरलो. ते माझ्या ग्रामीण लोकांच्या वावरातून व भ्रष्टाचाराविरुद्ध लढ्यातून शक्य झाले. मी कोणाला वैयक्तिक दुखावण्यासाठी बोललेलाे नाही. विपर्यास झाला हे मात्र वाईट. अर्थ चुकीचा लावल्याने महाराष्ट्रातील लोकांचे मन कलुषित झाले असेल तर याबद्दल खेद व्यक्त करतो,’ असे जानकर यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी जानकरांचा निषेध सुरु ठेवला आहे. जानकरविरोधी आंदोलनाची सर्वाधिक धग पुणे जिल्ह्यात दिसून आली. पुणे शहरासह लोणावळा, शिरुर, राजगुरुनगर, बारामती परिसरात अनेक ठिकाणी जानकरांचे पुतळे जाळण्यात आले.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय म्हणाले अजित पवार...
बातम्या आणखी आहेत...