आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात पार्‍याने ओलांडली पस्तिशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मार्च महिन्याचा पहिला पंधरवडा कूल अनुभव देणारा ठरला. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून राज्यभरातील पारा चढत चालला आहे. राज्यातील प्रमुख शहरांत कमाल तापमानाने पस्तिशी ओलांडली असल्याने उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. राज्यात सोमवारी सर्वाधिक तापमान भिरा येथे 40.5 अंश तर सर्वात कमी तापमान जळगाव येथे 16.5 अंश इतके नोंदवले गेले.

या वर्षी मात्र फेब्रुवारी महिन्याच्या शेवटचा आणि मार्चचा पहिला आठवडा राज्याने अवकाळी पाऊस आणि प्रचंड गारपीट असे विचित्र हवामान अनुभवले. होळीनंतर उकाड्याची सुरुवात झाली आणि गेल्या पाच दिवसांपासून प्रमुख शहरांतील कमाल तापमानाने पस्तिशी पार केल्याची माहिती पुणे वेधशाळेतर्फे देण्यात आली. तसेच येत्या आठवड्यात राज्यात तापमानाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह कोकणातही उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. येत्या 48 तासांत मराठवाड्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

असून उर्वरित भागात हवामान कोरडे राहील, असे पुणे वेधशाळेतील सूत्रांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

प्रमुख शहरांतील कमाल तापमान
औरंगाबाद 35.9, नाशिक 36.8, सोलापूर 39.4, जळगाव 38, अहमदनगर 38.4, अकोला 38.2, अमरावती 37.4, पुणे 37.3, कोल्हापूर 38, सांगली 38.5, सातारा 38.4, परभणी 37.4, नांदेड 38, बीड 37.6, बुलडाणा 35, चंद्रपूर 36, नागपूर 37.2, वर्धा 38.