पुणे - शिवशहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेला इतिहास वस्तुनिष्ट नाही. त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अनेक काल्पनिक आणि खोट्या गोष्टीही घुसवल्या आहेत. त्यामुळे परंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊ नये, असे मत ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त भालचंद्र नेमाडे आणि ख्यातकीर्त कादंबरीकार, अभ्यासक डॉ. नागनाथ कोत्तापले या साहित्यिक द्वयांनी व्यक्त केले. या बाबत त्यांच्यासह इतर साहित्यिकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले आहे.
नेमाडे नेमके काय म्हणाले ?
''बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचं केलेलं चित्रण इतिहासाला धरून नाही. त्यामुळं त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येऊ नये. बाबासाहेबांच्या निष्ठेविषयी मला अजिबात शंका नाही. त्यांच्याविषयी नितांत आदर आहे. पण, शिवाजी महाराजांबद्दलची आमच्या मनात असलेली प्रतिमा वेगळी आहे. बाबासाहेबांचं शिवरायांविषयीचं लेखन आमच्या आकलनात बसत नाही,'' अशा शब्दांत त्यांनी पुरंदरे यांच्या पुरस्काराला विरोध केला.
निवेदनावर कुणाच्या स्वाक्ष-या आहेत
बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊ नये, या मागणीसाठी भालचंद्र नेमाडे यांच्यासह डॉ. नागनाथ कोतापल्ले, मुक्ता दाभोलकर, मेघा पानसरे, विद्या बाळ, यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
पुरंदरे यांच्या 'राजा छत्रपती' या कादंबरीविषयी नेमका वाद काय ? वाचा पुढील स्लाइवर...