आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र गारठला.. नगरला सर्वात कमी ५.६ अंश तापमान मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्रात थंडीची लाट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे : बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाच्या प्रभावाने मध्यंतरी गायब झालेली थंडी परतली असून विदर्भासह राज्यात थंडीची लाट आल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. राज्याच्या अनेक भागांत किमान तापमान ३ ते ५ अंशांनी घसरले आहे.
उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्याला हुडहुडी भरली.शनिवारी सर्वात कमी ५.६ अंश तापमान अहमदनगरला नोंदले. महाबळेश्वरच्या वेण्णा लेकवर हिमकणांचा गालिचा पसरला आहे.
विदर्भ, मराठवाड्याच्या बहुतांश भागात पारा उतरला. हवामान विभागाच्या माहितीनुसार मराठवाड्यात १३ व १४ डिसेंबरला पावसाची शक्यता आहे. उर्वरित ठिकाणी हवामान कोरडे राहील.
वादळाची वाटचाल आंध्र प्रदेशकडे
बंगालच्या उपसागरात ‘वरदाह’ चक्रीवादळ घोंगावत आहे. बाष्पयुक्त वारे-ढग चक्रीवादळाने आकर्षित केले आहेत. त्यामुळे अंदमान-निकोबार परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. हे वादळ आंध्र प्रदेशच्या किनारी प्रदेशाकडे वेल्लोर-मछलीपट्टणमच्या दिशेने सरकत आहे.
वादळाने बाष्प खेचून घेतल्याने थंड कोरडे वारे राज्यात थेट प्रवेश करत आहेत. परिणामी थंडीचा कडाका वाढला आहे. दोन दिवस ही स्थिती राहण्याची शक्यता असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...