आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Engineering Admission: Online Application Forms Opens From Friday

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात अभियांत्रिकी प्रवेशास आजपासून सुरुवात, 20 जूनपर्यंत मुदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून (5 जून) सुरुवात होत आहे. राज्यातील प्रमुख शहरात व ग्रामीण भागातही प्रवेशप्रक्रियेसाठी डीटीईने (तंत्रशिक्षण संचालनालय) विविध महाविद्यालयात एआरसी सेंटर (प्रवेश नोंदणी केंद्र) स्थापन केली आहेत.
सुलभीकरणाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना एआरसीवर तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळणार आहे. अभियांत्रिकीच्या पूर्ण वेळ चार वर्षांच्या अभ्यासक्रम प्रवेशासाठी (प्रथम वर्ष 2015-16) कॅप राउंडमध्ये सहभागी होण्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांना ते 20 जूनदरम्यान ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रे पडताळणी, अपडेटेशन, अर्ज स्वीकृती, निश्चित करण्याची मुदत आहे. कॅप राउंडमध्ये सहभागानंतरच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळण्याची अट आहे.
डीटीईच्या अधिकृत संकेतस्थळावरही संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून तीन फेऱ्यांमध्ये प्रवेशप्रक्रिया केली जाणार आहे. यात दोन फे-यांमध्ये विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रमाने मागितलेल्या महाविद्यालयांत प्रवेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर राहून गेलेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशनाने प्रवेश दिले जातील. तिसरी फेरी समुपदेशनाची राहणार आहे.
ही कागदपत्रे आवश्यक-

खुल्या संवर्गासाठी दहावी, बारावी गुणपत्रक, शाळेचा दाखला, वय अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. ओबीसी संवर्गासाठी या पाच कागदपत्रांसह जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेयर ही तीन कागदपत्रे आवश्यक आहेत. तसेच एससी एनटी संवर्गाला नॉन क्रिमिलेयरची आवश्यकता नाही.
प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक-
ऑनलाईन नोंदणी- 5 ते 18 जूनदरम्यान कागदपत्रे पडताळणी, अपडेटेशन, अर्ज स्वीकृती निश्चिती. 5 ते 20 जूनदरम्यान सायंकाळी 5 वाजेपर्यंत
प्रस्तावित गुणवत्ता यादी- 21 जून सायंकाळी 5 वाजता
अर्जदारांच्या हरकती असल्यास स्वीकारणे- 22 ते 24 जूनदरम्यान सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुदत
गुणवत्ता यादी - 26 जून सायंकाळी 5 वाजता.