आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Foundation Award Declered To Manohar, Bhave

मनोहर, भावेंना महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील लक्षणीय योगदानासाठी ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर आणि पुष्पा भावे यांना महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रतिष्ठेचे जीवगौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्रत्येकी दोन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.

फाउंडेशनचे पुरस्कार हे साहित्य व सामाजिक क्षेत्रात अत्यंत मानाचे समजले जातात. पुढील वर्षी १० जानेवारीला या पुरस्कारांचे वितरण पुण्यात होणार आहे. गेल्या वर्षीपासून देण्यात येणारा डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना देण्यात येणार आहे.