आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कारगिल विजय दिवस\' कार्यक्रम पत्रिकेवर चिनी सैन्याचे छायाचित्र; महाराष्ट्र सरकारचा प्रताप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महाराष्ट्र सरकारच्या राज्य सैनिक कल्याण विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आलेल्या 'गोरखा रेजीमेंट'चे छायाचित्र समजून महाराष्ट्र सरकारने चिनी सैन्याच्या ह्यूमन ब्रिजचे छायाचित्र 'कारगिल विजय दिवस' कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर प्रसिद्ध केले आहे.
उत्तराखंडमध्ये आलेल्या नैसर्गिक प्रकोपादरम्यान संबंधित छायाचित्र इंटरनेवर अपलोड करण्‍यात आले होते. भारतीय लष्कराचे हे छायाचित्र असल्याचे सांगितले जात होते. परंतु त्यानंतर खुलासा आला, की संबंधित छायाचित्र चिनी जवानांचे आहे. आणि तेच छायाचित्र कारगिल विजय दिवसाच्या कार्यक्रम पत्रिकेवर झळकल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
भारतीय लष्कराचे जवान समजून हे छायाचित्र 'फेसबुक' आणि 'ट्विटर' सारख्या सोशल नेटवर्किंग साइट्‍सवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्‍यात आले होते. महाराष्ट्र सरकारने भारतीय लष्कराच्या शौर्यगाथेचे प्रतिक म्हणून 14 व्या कारगिल विजय दिवस कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर प्रसिद्ध केला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 'या छायाचित्रावरून महाराष्ट्र सरकार झाले कन्फ्यूज्ड'