आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्तात घरांचा फुगा फुटला, पुण्यातील बिल्डरला नाेटीस, साेमय्यांची तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यातील मॅपल ग्रुपतर्फे करण्यात आलेली जाहिरात... - Divya Marathi
पुण्यातील मॅपल ग्रुपतर्फे करण्यात आलेली जाहिरात...
पुणे- पंतप्रधान नरेंद्र माेदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या छायाचित्रांचा वापर करून पुण्यात पाच लाखांत घर देण्याची जाहिरात करणाऱ्या बिल्डरच्या विरोधात नोटीस बजावण्यात आली आहे.
‘आपलं घर' या योजनेअंतर्गत स्वस्तात घर देण्याचा वायदा करणाऱ्या मोठ्या जाहिराती ‘मॅपल बिल्डर्स'ने केल्या होत्या. प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावावर सरकारी अर्थसाह्य मिळण्याचा दावाही त्यात करण्यात आला होता. मात्र, या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या अाहेत, असा अाराेप करत त्याविरोधात भाजपचे खासदार किरीट सोमय्या व पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी तक्रार दाखल केली हाेती. त्याची दखल घेत संबंधित बिल्डरला नोटीस बजावण्यात आली आहे. सदर जाहिरातीद्वारे घरासाठीच फॉर्म भरून घेण्याचा धडाका लावण्यात आला. प्रोसेसिंग फीच्या नावाखाली हजाराे इच्छूकांकडून ११४५ रुपये परत न करण्याच्या अटीवर उकळण्यात अाले. "वास्तविक अशा अर्जांवर प्रक्रिया करण्याचा किंवा लाभार्थींची पात्रता-अपात्रता ठरवण्याचा अधिकार खासगी बिल्डरला नाही, तरीही काहींनी राजरोसपणे हा उद्योग सुरू केला आहे. समाजाच्या तळागाळातील लोकांच्या भावनांशी काही समाजकंटकांनी सुरू केलेला हा खेळ थांबवायला सध्या तरी कोणतीही सरकारी यंत्रणा पुढे सरसावताना दिसत नाही. त्यामुळे अशा प्रकारांना बळी पडणाऱ्याच्या पदरी सरतेशेवटी निराशाच पडणार आहे,’ असे कुंभार यांनी सांगितले. दरम्यान, खासदार किरीट सोमय्या यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर सरकारने साेमवारी सायंकाळी ‘आपलं घर'च्या बिल्डरला नोटीस बजावली आहे. तसेच पुण्याच्या मॅपल ग्रुपवर गुन्हेगारी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारने म्हाडाच्या सीईओंनाही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
शासकीय याेजनेशी संबंध नाही : गृहनिर्माण मंत्री
पाच लाखांत घर देणाऱ्या जाहिरातीतील योजना शासनाची नसून पंतप्रधान आवास योजनेतही त्याचा समावेश नसल्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्रातील पंतप्रधान आवास योजनेचे काम पाहणाऱ्या निर्मल देशमुख आणि मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली असून पुणे विभाग अधिकारी आणि पालकमंत्र्यांकडून याबाबत अधिक माहिती मागवणार असल्याचे ते म्हणाले. पालकमंत्री गिरीश बापट यांनीही या याेजनेशी अापला संबंध नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, संबंधित जाहिरात करणाऱ्या बिल्डरला मंत्रालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले अाहेत.

काय आहे तक्रार ?
१) पुणे शहराजवळ स्वप्नातले घर केवळ पाच लाखांत, अशी जाहिरात मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत घराची नोंदणी करण्यासाठी ग्राहकांकडून १ हजार १४५ रुपये परत न करण्याच्या अटीवर घेतले जात अाहेत. या माध्यमातून ग्राहकांची लूट केली जात अाहे.

२) पाच लाखांत घर या योजनेच्या जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट यांची छायाचित्रे वापरण्यात आली आहेत. त्यामुळे ही योजना केंद्र शासनाने अथवा राज्य शासनाने प्रस्तावित केल्याचा भास नागरिकांना झाला. याकडे किरीट सोमय्या यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.
पुढे वाचा, काय आहे ही योजना....