आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील तुरूंग कच्च्या कैद्यांनीच झाले हाऊसफुल्ल, जेलमध्ये सध्या 73 % कच्चे कैदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 पुणे- वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कारागृहातील संख्याही वाढत आहे. राज्यातील मध्यवर्ती कारागृहांसह अन्य ५४ कारागृहांमध्ये शिक्षा झालेल्या कैद्यांपेक्षा जास्त कच्चे कैदीच आहेत. सर्व कारागृहांत २७ टक्के शिक्षा झालेले, तर ७३ टक्के कच्चे कैदी आहेत. 

 


राज्यात वर्ग-१, अाणि २ ची एकूण ५४ कारागृहे असून त्यांची कैदी क्षमता २३ हजार ९४२ अाहे. या कारागृहांत सध्या एकूण ३१ हजार ४६४ पुरुष आणि १,४४५ महिला कैदी आहेत. यापैकी फक्त ८,३१८ पुरुष आणि ३७० महिलांनाच शिक्षा झालेली आहे. या कैद्यांच्या निवास, भोजन, सुरक्षा, काैशल्य प्रशिक्षण, कामे अादी बाबींची व्यवस्था करताना प्रशासनाला रोज तारेवरची कसरत करावी लागत अाहे. या कैद्यांकडून काेणत्याही प्रकारचा उपद्रव हाेऊन कारागृहात कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी प्रशासनाला नेहमीच दक्ष राहावे लागते.


 
कारागृहात कैद्यांची अतिगर्दी-

 

 

- येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार 'दिव्य मराठी'शी बाेलताना म्हणाले की, देशातील प्रत्येक कारागृहात कच्च्या कैद्यांची गर्दी जास्त आहे. 
- कैद्यांना न्यायालयात नेण्याएेवजी व्हिडिअाे काॅन्फरन्सिंगद्वारे सुनावणी करण्यावर भर दिला जात अाहे. लहान परिसर असलेल्या कारागृहात कैदी संख्या जास्त झाल्यास अडचणी येतात. 

 

 

कारागृहांच्या बंदी क्षमता वाढवणे अावश्यक-


 
- राज्यात येरवडा, काेल्हापूर, मुंबई, ठाणे, अाैरंगाबाद, नाशिक राेड, नागपूर, अमरावती, तळाेजा अशी एकूण मध्यवर्ती कारागृह असून त्यांची कैदी क्षमता १४,८४१ आहे. 
- मात्र, सध्या या ठिकाणी २२,९०६ कैदी राहतात. यापैकी सर्वाधिक ४,९६९ कैदी एकट्या येरवडा कारागृहातच आहेत. 
- अाैरंगाबाद मध्यवर्ती कारागृहाची ५७९ कैदी क्षमता असतानाही या ठिकाणी १,१६४ कैदी आहेत, तर नाशिक राेड कारागृहात ३,२८६ आणि अमरावती मध्यवर्ती कारागृहात ९९० कैदी आहेत. 

 

पुढे स्लाईडद्नारे पाहा, यासंबंधित अधिक माहिती...

बातम्या आणखी आहेत...