आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Minster Tounge Slipped Says Rani Mukharjee Is Outdated Actress

अभिनेत्री राणी मुखर्जी आता \'आऊटडेटेड\', राष्ट्रवादीचे मंत्री दिलीप सोपलांची मुक्ताफळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री राणी मुखर्जी)
सांगली- राजकारणी नेत्यांची जीभ कशी घसरते याचे अनेक नमुने आपण इलेक्ट्रानिक मिडियाच्या दुनियेत पाहत असतो. आपल्या वक्तव्याची जनमानसात खिल्ली उडविली जात असल्याचे पाहताच हेच राजकारणी आपण तसे बोललो नव्हतोच असा साळसूद करतात. मात्र, ते बोलले तेच नेमका कॅमेरा टिपतो. कॅमेरा कधीच खोटे बोलत नसतो.
आता अशीच एक घटना काल सांगलीतील तासगावमध्ये घडली. गृहमंत्री आर आर पाटील यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे मंत्री दिलीप सोपल यांचा सार्वजनिक कार्यक्रम होता. त्यावेळी गृहमंत्री आबा यांची स्तुती करताना सोपलांची चीभ चांगलीच घरसली. सोपल म्हणाले, बुधवारी राणी मुखर्जी आबांशी हस्तांदोलन करू इच्छित होती. तर, आबा मागे सरकत होते व हातही घट्ट धरून बसले होते. अहो आबा, राणी मुखर्जी आता आऊटडेटेड झाली आहे. तुम्ही अगदी करीना कपूरचा हात हातात घेतला तरी तुमच्यासारख्या सज्जन माणसांवर कोणी शंका घेणार नाही.
आपल्याला माहित असेलच की, बुधवारी मुंबईत मुंबई पोलिसाच्या महिला बीट मार्शलच्या टीमला पोलिस सेवेत सामील करून घेण्याच्या समारंभात अभिनेत्री राणी मुखर्जीला बोलाविण्यात आले होते. या कार्यक्रमाला गृहमंत्री आर आर पाटील उपस्थित होते. यावेळी राणी मुखर्जीने सर्व वरिष्ठ पोलिस अधिका-यांसह आबांशी हस्तांदोलन केले होते.
हाच धागा पकडून सोपल यांनी राणी मुखर्जीने हातात हात देताना आबांची झालेली अवस्था पाहून आबा कसे सज्जन व्यक्ती आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी ते एका महिलेचा अपमान करीत आहेत हे विसरले. दरम्यान, सोपल यांच्या वक्तव्यावरून शिवसेनेच्या नेत्या नीलम गो-हे यांनी कडक शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. सोपल यांना आबांच्या चरित्र्याचे सर्टिफिकेट देण्यास कोणी सांगितले आहे. आबा सज्जन आहेत हे सांगण्याची त्यांच्यावर वेळ आली यावरून आजच्या पुरुषी राजकारणी लोकांची विकृत मानसिकता दिसून येते. कोणतेही अभिनेती व महिला कधीही आऊटडेटेड होत नसते. या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे मंत्री दिलीप सोपल आता अडचणीत येण्याची शक्यता आहे.
पुढे वाचा, सोपलांचा तासगावमध्ये दौरा का?...