आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मान्सूनचे आगमन लांबले; पाच दिवसांची प्रतीक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे । मान्सूनने हवामान खात्याचा अंदाज चुकवला. शुक्रवारी तो केरळच्या किनारपट्टीवर धडकणे अपेक्षित होते. मात्र नव्या अंदाजानुसार पावसासाठी आणखी 5 दिवस तरी वाट पहावी लागेल.
पुणे वेधशाळेच्या संचालिका सुनितादेवी यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालचा उपसागर आणि नैऋत्य अरबी समुद्रात मॉन्सूनची आगेकूच होण्यास दोन-तीन दिवस अनुकूल वातावरण आहे. शुक्रवारी मान्सून केरळचा उंबरठा ओलांडण्याची अपेक्षा होती. मात्र, चार दिवसांपासून श्रीलंकेजवळच तो थबकला आहे. जूनच्या आधी किंवा नंतर पाच दिवस या कालावधीत मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज सध्याची हवामानस्थिती पाहता खरा ठरण्याची चिन्हे नाहीत.
अरबी समुद्रातील चक्राकार वा-याच्या दबावामुळे मान्सूनला विलंब होत आहे. केरळमध्ये सर्वत्र पश्चिम वारे जोरात वाहू लागल्यानंतर सर्वदूर दमदार पाऊस सुरू होतो. मान्सून दाखल झाल्याचे हे ठळक निकष आहेत. सध्या केरळात अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडू लागला आहे, परंतु तो मान्सूनचा नाही.
उशीर झाला...चिंता नको
‘‘मान्सूनचे आगमन वेळेत अथवा विलंबाने होण्याचा कोणताही परिणाम पुढील काळातील पावसावर होत नाही. सन 2005 मध्ये ७ जूनला मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहचला होता; परंतु, त्यावर्षी अतिशय दमदार पाऊस पडला. गेल्यावर्षी अंदाजापेक्षा दोन दिवस आधी म्हणजे 31 मे रोजी मोसमी पाऊस दाखल होऊनही नंतर बेताचा पाऊस झाला, असे सुनीतादेवी यांनी स्पष्ट केले.
अवकाळी पावसाने घेतला एकाचा बळी