आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमाप्रांतीयांचा मराठीचा नारा आता ‘मसाप’च्या कार्यक्षेत्रात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- विभाजनाचे दु:ख मनात ठेवूनही मराठीपण टिकवून ठेवणार्‍या बेळगाववासीयांचा आवाज महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कानावर पोहोचला आहे. त्यामुळे घटनादुरुस्ती करून बेळगावच्या शाखेला मसापशी संलग्न करून अधिकृत शाखेचा दर्जा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सीमावासीयांचे मराठीपण सामावून घेण्यासाठी बेळगाववासीयांनी लढा दिला आहे. त्याला प्रतिसाद देत मसापच्या कार्यकारिणीने बेळगाव शाखेला मान्यता दिली आहे. कर्नाटकमध्ये प्रतिकूल परिस्थितीशी झगडत तेथील मराठी मंडळींनी मराठी भाषा जपली, फुलवली आहे. त्यामुळे बेळगावला मसापची शाखा असावी, हा आग्रह जुनाच आहे. मात्र, बेळगाव कर्नाटकचा भाग असल्याने मसापला कार्यक्षेत्राची मर्यादा होती. मसाप घटनेनुसार काम करते. बेळगावला सामावून घेण्यासाठी मसापच्या घटनेतील कार्यक्षेत्र वाढवण्याच्या मुद्यावर दुरुस्ती करावी लागणार आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती मसापच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी दिली.

बेळगावच्या समावेशाचा मुद्दा अजून प्राथमिक अवस्थेत असला तरी घटनादुरुस्ती समितीच्या आजवरच्या बैठकांत त्यावर चर्चा झाली आहे. घटनादुरुस्तीचा अंतिम मसुदाही तयार करण्यात आला आहे, योग्य वेळी त्यावर निर्णय घेतला जाईल, असे डॉ. वैद्य यांनी स्पष्ट केले.