पुणे - दहावीचा निकालाचा आनंद आज अनेकांच्या चहेऱ्यावर झळकत आहे. गुणवंत आणि यशवंत विद्यार्थ्यांचे सर्वच कौतूक करत आहेत. मात्र, त्याचवेळी असेही काही विद्यार्थी आहेत ज्यांच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. कारण त्यांचा 'निकाल' लागता-लागता राहिला अर्थात 35 टक्के गुणांसह काही विद्यार्थ्यांनी आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. त्यांची संख्या थोडीथोडकी नसून 150 च्या जवळपास आहे. त्याचवेळी 100 पैकी 100 गुण मिळवणारेही विद्यार्थी कमी नाहीत. मंगळवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात असेच काही इंट्रेस्टिंग फॅक्ट्स समोर आले आहे.
निकालाचे इंट्रेस्टिंग फॅक्ट्स
- 35% गुणांसह 153 विद्यार्थी उत्तीर्ण.
- 193 विद्यार्थ्यांनी पटकावले 100 टक्के गुण.
- राज्यातील 3 हजार 676 शाळांचा निकाल 100 टक्के.
- 32 शाळांना भोपळाही फोडता आला नाही.
- 90 टक्क्यांहून जास्त गुण मिळवणारे 48 हजार 470 विद्यार्थी.
- एक लाख 8 हजार 915 विद्यार्थी एटीकेटीतून उत्तीर्ण.
एटीकेटी म्हणजे काय..
- दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला एटीकेटी घेऊन अकरावीला प्रवेश घेता येतो.
बेस्ट फाइव्ह काय...
- बेस्ट फाइव्ह निकषामुळे सहापैकी ज्या पाच विषयांची टक्केवारी अधिक असेल, तेच गुण ग्राह्य धरून निकाल लावला जातो.