आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात 91.26 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; बारावीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा निकाल तब्बल 91.26 टक्के लागला असून, कोकणातील 95.68 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे तर नाशिक विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बारावीच्या परीक्षेत बाजी मारली आहे. राज्यात उत्तीर्ण मुलींचे प्रमाण 94.26 टक्के आहे तर मुलांचे प्रमाण 88.31 टक्के इतके आहे. कोल्हापूर विभागातील 96.27 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
विज्ञान शाखेतील 95.72 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर वाणिज्य विभागाचे 91.60 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेतील 86.31 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर एमसीएसव्ही विभागाचे 89.20 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
खाली आपण पाहूया विभागवर निकालाची टक्केवारी
मुंबई- 90.11 टक्के
पुणे- 91.96 टक्के
नागपूर- 92.11 टक्के
औरंगाबाद- 91.77 टक्के
कोकण- 95.67 टक्के
नाशिक- 88.13 टक्के
अमरावती- 92.50 टक्के
कोल्हापूर- 92.13 टक्के
लातूर- 91.13 टक्के.
खालील वेबसाईटवर तुम्ही बारावीचा निकाल पाहू शकता...
असा पाहा निकाल!!!

समजा तुम्ही www.mahresult.nic.in या वेबसाईटला भेट दिली तर तेथे तुम्हाला निकाल पाहाण्यासाठी तुम्हाला तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल. त्यानंतर खालच्या रकाण्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे लिहावी लागतील.

उदाहरणार्थ, समजा तुमचा नंबर G123456 असा आहे आणि तुमच्या आईचे नाव कांचन आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात G123456 हा नंबर आणि दुस-या रकान्यात कॅपिटलमध्ये KAN असे लिहावे लागेल.
पुढे पाहा, बोर्डाचा निकाल...
बातम्या आणखी आहेत...