आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदी, आर्थिक मंदीतही वाहन खरेदीत महाराष्ट्र अव्वल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- नोटबंदी, जीएसटी, आर्थिक मंदी आदींचा परिणाम होऊनही वाहन खरेदीच्या बाबतीत महाराष्ट्राने यंदाही देशात अव्वल स्थान मिळवले आहे. राज्यात गतवर्षीच्या तुलनेत सुमारे १,३१,१५४ अधिक वाहने विकली गेली आहेत. शहरांच्या बाबतीत पुणे देशात प्रथम क्रमांकावर आहे.  

केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी ते १३ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू या महानगरांपेक्षाही पुण्यात सर्वाधिक वाहनांची भर पडली आहे. ११ महिन्यांत पुण्यात २ लाख ३१ हजार १९ वाहनांची नोंदणी झाली. याच कालावधीत महाराष्ट्रात एकूण २१,२७,२८७ वाहनांची विक्री झाली. या काळात रोज ६,७१० नवी वाहने राज्याच्या रस्त्यांवर धावली. यातून शासनाला तब्बल ५,८२२.६४ कोटींचा महसूल मिळाला आहे. 

देशपातळीवर महाराष्ट्रापाठोपाठ गुजरात व पश्चिम बंगाल या राज्यांत सर्वाधिक वाहन खरेदी झाली आहे. गुजरातेत यंदाच्या १३ नोव्हेंबरपर्यंत १३,६८,७२९, तर पश्चिम बंगालमध्ये ८,७२,६१८ वाहनांची नोंदणी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत या तिन्ही राज्यांत वाढ दिसून येते. १ जानेवारी ते १३ नोव्हेंबर २०१६ दरम्यान महाराष्ट्रात १९,९६,१३३ वाहनांची नोंदणी झाली होती. यंदाच्या तुलनेत ही संख्या १ लाख ३१ हजारांनी कमी आहे. गुजरात व पश्चिम बंगालध्येही मागच्या वर्षी अनुक्रमे १३ लाख ६२ हजार आणि ८ लाख १९ हजार कमी वाहने विकली गेली होती. महाराष्ट्रात आणि देशात सर्वाधिक वाहन नोंदणीत पिंपरी-चिंचवडचा दुसरा क्रमांक आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सव्वा लाख, तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ठाण्यात १ लाख ४ हजार वाहन नोंदणी झाली. दिवाळीच्या मुहूर्तावर  सप्टेंबरमध्ये २  लाख १५ हजार, तर ऑक्टोबरमध्ये २ लाख ५५ हजार नवी वाहने रस्त्यावर उतरली. यंदाच्या मार्च, एप्रिल आणि मे या ऐन उन्हाळ्याच्या काळातही वाहन नोंदणीत मोठी वाढ  झाल्याचे दिसते.
 
दुचाकींचा वाटा मोठा 
वाहन नोंदणीमध्ये स्वयंचलित दुचाकींचा वाटा सर्वात मोठा आहे. एकूण वाहन नोंदणीत १६,४३,६९४ दुचाकी आहेत. त्याखालोखाल ३,३७,५६३ कारची नोंदणी झाली. जळगाव, नागपूर, वसई, मुंबई मध्य, मुंबई पूर्व, बोरिवली, कल्याण, पनवेल, सांगली, सोलापूर या आरटीओत ५० ते ७० हजारांदरम्यान वाहन नोंदणी झाली.
 
पुढील स्‍लाईडवर पाहा,  देशात सर्वाधिक वाहन नोंदणी पुण्यात...
बातम्या आणखी आहेत...