आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtrain Leading For Visit Lakshyadwap Island ;35 Marathi Citizen

लक्षद्वीप ‘बेट-भेट’वर महाराष्ट्रीयन आघाडीवर ;एकूण पर्यटकांपैकी 35 टक्के नागरिक मराठी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - सागरीसृष्टीचे नंदनवन असणा-या लक्षद्वीप सहलीचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. या निसर्गसुंदर बेटांना भेट देणा-यांमध्ये मराठी मंडळींनी आघाडी घेतल्याचे निरीक्षण लक्षद्वीपचे टूरिझम संचालक डी. कार्तिकेयन यांनी नोंदवले. लक्षद्वीपच्या पर्यटन व्यवसायात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे, असेही ते म्हणाले.

लक्षद्वीप टूरिझमच्या वतीने पुण्यात पर्यटनविषयक रोड शो आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने कार्तिकेयन बोलत होते. लक्षद्वीपचा पर्यटन कालावधी ऑक्टोबर ते मे असा असतो. ऑक्टोबर 2011 ते
मे 2012 या पर्यटन काळात देशातून पाच हजार पर्यटकांनी लक्षद्वीपला भेट दिली. त्यात 35 टक्के वाटा मराठी पर्यटकांचा होता.

केळकर यांचा सन्मान
पुण्यातील सिमास ट्रॅव्हल्सचे डॉ. विश्वास केळकर यांचा लक्षद्वीप टूरिझमच्या इतिहासात प्रथमच लक्षद्वीपमधील पर्यटनातील योगदानाबद्दल ज्यूएल ऑफ ब्ल्यू लगून पुरस्काराने सन्मान केला.
लक्षद्वीप हा 36 बेटांचा समूह
क्षेत्रफळ अवघे 32 चौरस किमी
4200 चौरस किमीचा समुद्रकिनारा
प्रवाळ बेटांचा हा देशातील एकमेव समूह
पर्यटन विकासासाठी युनियन टेरिटरी ऑफ लक्षद्वीप प्रयत्नशील