आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahavitaran's Four Engineer Arrested, One Lack Bribe Took

‘महावितरण’चे चार अभियंते अटकेत, एक लाखाची लाच घेताना अडकले जाळ्यात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - महाराष्‍ट्र राज्य वीज वितरण विभागातील (महावितरण) दोन कार्यकारी व दोन कनिष्ठ अभियंत्यांना दोन वेगवेगळ्या घटनेत एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत पथकाने (एसीबी) बुधवारी रंगेहाथ अटक केली.
भानुदास भगवंतराव भोसले, सदाशिव सरपाले, प्रशांत पराते आणि लक्ष्मीकांत जोंधळे अशी अटक करण्यात आलेल्या अधिका-यांची नावे आहेत. भोसले व सरपाले यांना 50 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली, तर दुस-या घटनेत धनकवडी महावितरण विभागातील उपकार्यकारी अभियंता (वर्ग दोन) प्रशांत पराते व कनिष्ठ अभियंता लक्ष्मीकांत जोंधळे यांना प्रत्येकी 25 हजार व 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. याप्रकरणी अनिल शिळीमकर नितीन मुळे यांनी तक्रार दिली होती.


शिळीमकर यांचा वैष्णवी इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्ट नावाने विद्युत ठेकेदारीचा व्यवसाय आहे. त्यांनी आंबेगाव बुद्रुक येथील राजेश यादव यांच्या श्रीमंगलमूर्ती डेव्हलपर्स इमारतीचा विघुत जोडणीचा ठेका घेतला आहे. त्याबाबत दोघांनी लेखी करार केला असून सदर जागी विद्युत जोडणी मिळण्यासाठी त्यांनी पदमावती विद्युत विभागात अर्ज दाखल केला. त्यानुसार त्यांचा अर्ज 21 सप्टेंबर रोजी मंजूर करण्यात आला पण तो देण्यासाठी भोसले यांनी 50 हजार रुपयांची लाच मागितली, तर एक महिन्यापूर्वी अभियंता सरपाले यांनी 20 हजार रुपयांची मागणी करत 15 हजार रुपये स्वीकारून उर्वरित पाच हजारांची मागणी केली.


पैशाची मागणी
दुस-या घटनेत मुळे यांनी आंबेगाव बुद्रक येथील चव्हाण-भोईटे असो. प्रमो व बिल्डर्सच्या नवीन इमारतीसाठी वीज जोडणीचे काम मंजूर करण्यासाठी धनकवडी महावितरण येथे अर्ज दाखल केला होता. त्यांना हे काम मंजूर होण्यासाठी पराते यांनी 25 हजारांची तर गोंधळे यांनी 20 हजार रुपयांची मागणी केली. या दोन्ही घटनाबाबत एसीबीकडे तक्रार दाखल चौघांनाही अटक करण्यात आली.