आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयातून सुटीनंतर महेश माेतेवार पुन्हा कोठडीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/उस्मानाबाद - फसवणुकीच्या गुन्ह्यात उस्मानाबाद पाेलिसांनी अटक केलेला "समृद्ध जीवन'चा संचालक महेश माेतेवार याला शनिवारी ससून रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यानंतर पाेलिसांनी माेतेवार याची पुन्हा उस्मानाबादला रवानगी केली. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. न्यायालयाने त्याचा ताबा घेण्याची परवानगी ओडिशा पोलिसांना दिली. ओडिशा पोलिस सध्या उस्मानाबादेत आहेत.

ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. अजय तावरे म्हणाले, माेतेवार यांच्या छातीत दुखत असल्याने तपासणी व नंतर अंॅजिअाेप्लास्टी केली गेली. तब्येत व्यवस्थित झाल्यानंतर त्यांना सामान्य वाॅर्डमध्ये ठेवण्यात अाले हाेते. शनिवारी सकाळी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

उस्मानाबाद पाेलिसांच्या काेठडीची मुदत गुरुवारी संपत असताना महेश माेतेवारने छातीत दुखत असल्याची तक्रार केली हाेती. त्यानंतर त्याला साेलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात अाले हाेते. मात्र, त्या ठिकाणी अपुऱ्या वैद्यकीय सुविधा असल्याने त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात शुक्रवारी हलवले हाेते.