आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत कर्जदाराच्या मुलास वसुलीसाठी बँकेत कोंडले; 'महिंद्रा कोटक बँके'चा प्रताप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- काेटक महिंद्रा बँकेतून कर्ज घेतलेल्या कर्जदाराने अात्महत्या केली. त्याच्याकडील थकबाकी वसूलीसाठी बँकेतील कर्मचाऱ्यांनी दमदाटी करून कर्जदाराच्या मुलास कोंडून ठेवले. याप्रकरणी राहुल कमलाकर पाटील (रा. धानाेरी, पुणे) याने बँकेचे कर्मचारी अविनाश गवळी, अमाेल पांडे इतर एका जणाविरोधात विमानतळ पाेलिस स्टेशनमध्ये िफर्याद दिली.
राहुलचे वडील कमलाकर यांनी कर्जबाजारीपणामुळे फेब्रुवारी महिन्यात अात्महत्या केली हाेती. त्यांनी मार्च २०१५ मध्ये काेटक महिंद्रा बँकेडून सव्वापाच लाख रुपयांचे कर्ज घेतले हाेते. या कर्जाला १९ हजार ३७८ रुपयांचा हप्ता हाेता. मात्र, पहिला हप्ता भरल्यानंतर उर्वरित हप्ते थकले होते. त्यामुळे बँकेने राहुलला हप्ता भरण्यासाठी बँकेत बोलावले. या वेळी त्याने आपण हप्ता भरण्यास असमर्थ असल्याचे सांगत कायदेशीर कारवाई करण्याची विनंती बँक अधिकाऱ्यांना केली. मात्र, त्यानंतरही गवळी पांडे यांनी राहुलला हप्ता भरण्यासाठी बँकेतील एका खोलीत कोंडून ठेवले. त्यानंतर राहुलने पोलिसांत तक्रार दिली.
बातम्या आणखी आहेत...