आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; इनोव्हा चक्काचूर, एक ठार, 3 जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोणावळा- मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात होऊन इनोव्हा गाडीचा चक्काचूर झाला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघात एकाचा जागेवरच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेली माहिती अशी की, अपघात आज (बुधवारी) पहाटे 3 वाजेच्या सुमारास झाला. यात सांदीपान भगवान शिंदे (वय-60, रा.बीड) यांचा जागेवरच मृत्यू झाला. मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव येणारी कार (MH-23 AK 3888) रस्त्याच्या खाली उतरून तीन झाडांवर धडकून खोल नाल्यात कोसळली.  कारमध्ये एकूण 4 प्रवाशी प्रवास होते. त्यापैकी एकाचा जागेवरच मृत्यू झाला  तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी रुग्णांना पिंपरी चिंचवडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुभाष साहेबराव जगताप, किसन जठार, मुक्ताराम किसन तावरे, अशी जखमींची नावे आहेत. सगळे बीड येथील ढाणे गल्लीतील राहाणारे आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो..
बातम्या आणखी आहेत...