आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, 6 जण गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मळवली येथे झायलो गाडीचा भीषण अपघात होऊन दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (शुक्रवारी) सकाळी साडे सहाच्या सुमारास हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मुंबईहून पुण्याकडे येणारी गाडी (एम एच-14 सी एक्स-2003) चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडीने कठड्याला जोरदार धडक दिली. दोघांचा मृत्यू झाला आहे. देबजीत लहरी आणि वेदांत महाजन अशी मृत तरुणांची नवे आहेत. गाडीत एकूण आठ जण होते. त्यापैकी सहा जण गंभीर जखमी आहेत. हे सर्व विद्यार्थी असण्याची शक्यता लोणावळा ग्रामिण पोलिसांनी वर्तविली आहे.

25 फुटापर्यंत घासत गेली गाडी...
विशेष म्हणजे कठड्याला गाडीने धडक दिल्यानंतर ती 24 ते 25 फुटांपर्यंत घासत गेली आणि नंतर उलटली. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... एक्स्प्रेस वेवरील अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो...
बातम्या आणखी आहेत...