आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माळीण दुर्घटना: माळीण अजूनही अधांतरीच ! लाेक अाजही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आताची परिस्थिती - Divya Marathi
आताची परिस्थिती
माळीण (जि. पुणे) - भीमाशंकर जवळील डिंभे धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात डाेंगर अाणि झाडांच्या कुशीत वसलेले माळीण गाव वर्षभरापूर्वी निसर्गाच्या राैद्ररूपामुळे जमिनीच्या उदरात गडप झाले. मुसळधार पावसामुळे डाेंगराचा काही भाग या गावावर काेसळला अन् सुमारे १५१ अाबालवृद्धांना प्राण गमवावे लागले. ३० जुलै राेजी या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाले, मात्र काळीज चिरणारा ग्रामस्थांचा टाहाे अजूनही शमलेला नाही. या वर्षभरात माळीणवासीयांना तात्पुरते निवारे मिळाले, पुनर्वसनाचे काम मात्र अजूनही पूर्ण न झाल्याची खंत ते बाेलून दाखवतात. माळीणची दुर्घटना घडल्यानंतर भूगर्भशास्त्रज्ञांनी या गावची पाहणी करून हा भाग अजूनही धाेकादायक असल्याचे जाहीर केले हाेते. त्यामुळे निसर्गाच्या काेपातून बचावलेल्या पाच-सहा घरांचेही प्रशासनाने माळीण फाट्यावर निवारा शेडमध्ये स्थलांतर केले हाेते. दुर्घटनेत बचावलेली शाळा बंद करून, माळीण फाट्यावर नवीन छाेट्या शाळेची उभारणी केली अाहे. त्यामुळे ज्या ठिकाणी दुर्घटना घडली ते गाव अाता ‘एक हाेते माळीण’ अशी फक्त कहाणीच बनून राहिले अाहे.

न भरून येणारे नुकसान
माळीण गावात चिंचेवाडी, पसारवाडी, पाेटेवाडी, उंडेवाडी, काेकणेवाडी, लेंभेवाडी, झांजरेवाडी अशा सात वाड्या अाहेत. त्यापैकी माळीण गावठाणामध्ये मागील वर्षी ३० जुलैला सकाळी सव्वाअाठ वाजण्याच्या सुमारास डाेंगरकडा काेसळून ४० कुटुंबांसह ९२ महिला व ५९ पुरुष अशी १५१ माणसे गाडली गेली, त्यात ४० लहान मुलांचा समावेश हाेता. तसेच ५७ जनावरेही मृत्युमुखी पडली. सुदैवाने ३० पुरुष व अाठ महिला या दुर्घटनेतून बचावल्या. अाज पुण्यात श्रद्धांजली कार्यक्रम : माळीण दुर्घटनेला गुरुवारी एक वर्ष पूर्ण हाेत अाहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधुकर पिचड उपस्थित राहणार अाहेत.

पडकाईनेच केले अामचे गाव उद्ध्वस्त
माळीणचे रहिवासी हरिश्चंद्र झांजरे यांनी सांगितले की, ‘फाट्यावरील शाळेत शासनाने ४० पत्र्यांचे निवारा शेड उभारले असून त्यात ३० ते ३५ जण राहतात. माळीण गावच्या डाेंगरावर लहानपणापासून अाम्ही नैसर्गिक झरा वाहताना पाहिला अाहे. मात्र, मागील दाेन वर्षांत पडकाई याेजनेच्या माध्यमातून डाेंगरमाथ्यावरील जमीन सपाटीकरण करण्यात अाली व झरा दिसेनासा झाला. या दुर्घटनेला पडकाईच जबाबदार असून ही याेजना राबवली नसती तर अामचे गाव असे गडप झाले नसते.’

पुढे वाचा, मदत अजून दूरच