आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माळीणमध्ये अतिवृष्टीमुळे थांबविले बचाव पथकाचे मदतकार्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - माळीणमध्ये (ता. आंबेगाव) दरड कोसळून संपूर्ण गाव ढिगार्‍याखाली गडप झाल्याच्या घटनेला सहा दिवस उलटले तरी अद्यापही तिथे ‘एमडीआरएफ’चे मदत व बचावकार्य अविरत सुरू आहे. सोमवारी पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे बचाव पथकाला सकाळी काही वेळ मदत कार्य थांबवावे लागले. नंतरही दिवसभर संथगतीनेच काम करावे लागले.

मृतदेहांचे यापूर्वी अडिवरे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नंतर त्यांच्यावर माळीण फाट्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत होते. मात्र आता कुजलेलेच मृतदेह बाहेर निघत असल्याने वैद्यकीय अधिकारी घटनास्थळीच शवविच्छेदन करून मृतदेह स्मशानभूमीत पाठवत आहेत. अजूनही सुमारे 80 ते 100 मृतदेह ढिगार्‍याखाली असण्याची शक्यता आहे.