आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

का होते भूस्खलन? माळीण गावावर कशामुळे आले संकट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माळीण गावावर हे संकट कशामुळे आले, इतके दिवस गुण्यागोविंदाने राहणार्‍या माळीणवासीयांवर दु:खाचा पहाड अचानक का कोसळला, आदी प्रश्न अनेकांच्या मनात घर करू लागले आहेत. माळीण गावच्या प्रलयाची कारणे शोधण्याचा प्रयत्न ‘दिव्य मराठी’ने केला. भूस्खलनामुळे हे गाव उद्ध्वस्त झाले. भूस्खलन का होते, कोणत्या स्थितीत ते धोकादायक बनते, याची खालील कारणे आहेत.
भूस्खलनाची कारणे
भौगोलिक
0 जोरदार पाऊस
0 भूकंप
0 यंत्रांची धडधड
0 बर्फवृष्टी
रचनात्मक
0 उताराचा कोन
0 पुनर्बांधणी
0 डोंगरांच्या बाजूंची झीज
0 उतारावर पडणारा भार
0 झाडा-झुडपांत बदल
0 जमिनीची धूप
भौतिक
0 अतिवृष्टी
0 वेगाने बर्फ वितळणे
0 सतत पाऊस पडणे
0 भूकंपाचे धक्के बसणे
मानवनिर्मित
0 डोंगरावरील उत्खनन
0 रस्ते बांधकाम आणि घर बांधकाम
0 बंधारे, जलव्यवस्थापन
0 खाणकाम
0 पाण्याची गळती
माळीणमधील संभाव्य कारणे
0 निसर्गनिर्मित डोंगरांना धक्का लावल्यास मानवाच्या अस्तित्वावरच ते उलटतात. हे एक कारण असू शकते
0 पाण्याची गरज भागवण्यासाठी डोंगरावर बंधारा अथवा तलाव बांधले असावेत. त्यामुळे झालेली पाणी गळती
0 सरपणासाठी वृक्षतोडीने धूप रोखण्याची क्षमता क्षीण
0 गौण खनिज उत्खननाने भूकवच अधू झाल्याची शक्यता
0 उतारावर शेती कसल्यामुळे उताराचे स्थैर्य बाधित झाले
0 अवजड यंत्रे अथवा जड वाहतुकीमुळे हादरे