आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने मित्राच्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार, कासारवाडीतील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 पुणे- कासारवाडी येथे कामावर जात असताना महिलेवर तिच्या प्रियकराने कु-हाडीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना आज (रविवार) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
 
मनिषा चव्हाण (वय 35 रा. कासारवाडी) असे महिलेचे नाव असून, तिने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
चव्हाण यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, आज सकाळी कामावर जात असताना आरोपी सुभाष लांडगे याने मनिष चव्हाण या महिलेवर कु-हाडीने आठ ते नऊ वार केले. आरोपी हा मनिषा चव्हाण हिच्या नव-याचा मित्र आहे. त्यामुळे सुभाष लांडगेचे त्यांच्या घरी येणे-जाणे होते. यातूनच त्याला मनिषा आवडू लागली. पुढे मनिषाने आपल्यासोबत प्रेमसंबंध ठेवावेत यासाठी तो जबरदस्ती करू लागला. मात्र मनिषा चव्हाण यांनी नकार दिल्याने सुभाष लांडगेने मनिषावर आज सकाळी कु-हाडीने वार करत हल्ला केला.
 
घटनास्थळी भोसरी पोलिस पोहचले असून, आरोपी फरार झाला आहे. तर मनिषा चव्हाण यांच्यावर पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मनिषा यांची प्रकृती आता स्थिर आहे. पुढील तपास भोसरी पोलिस करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...