आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेट बँकिंगच्या व्यवहारातून पुण्यात एकाला 48 लाख रुपयांना गंडविले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे राहणार्‍या एका व्यक्तीच्या खात्यातून अज्ञात भामट्याने इंटरनेट बँकिंगचा वापर करून 48 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रकाश चिंतोडकर यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. चिंतोडकर यांच्या बॅँक खात्यात 79 लाख 28 हजार रुपये शिल्लक होते. यापैकी भामट्याने आर. टी.जी. सी. प्रणालीचा वापर करून 48 लाख रुपये परस्पर हस्तांतरित केले. दरम्यान, प्रवीण पारखी यांच्या एसबीआय बँकेतील खात्यातून एका भामट्याने 24 हजार रुपये रशियन रेल्वे येथे हस्तांतरित केल्याची तक्रारही पोलिसांकडे दाखल झाली आहे.