आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Man From Aurangabad Arrested For Sending Vulgur Sms

महिला डॉक्टरला अश्लिल मेसेज, औरंगाबादच्या युवकास अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - महिला डॉक्टरला मोबाइलवर वारंवार अश्लिल एसएमएस करुन त्रास देणार्‍या औरंगाबादच्या युवकास पोलिसांनी मंगळवारी अटक केली. दिलीप रुपचंद अहिर (वय 36) असे आरोपीचे नाव आहे.

पुण्यातील एका महिला डॉक्टरला अनोळखी क्रमांकावरुन अनेक दिवसांपासून अश्लिल एसएमएस येत होते. या त्रासाला कंटाळून त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी एसएमएस येणार्‍या मोबाइल क्रमांकाचा तपास केला असता, दिलीप आहिर हा एसएमएस पाठवित असल्याचे उघड झाले. पोलिसांनी मंगळवारी औरंगाबादेत जावून त्याला अटक केली.