आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Man Raped On His Friemd Who Is 24 Year Old Girl, Man Arrest

पुणे: ओळखीचा गैरफायदा घेत घरी बोलवून तरुणीवर बलात्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ओळखीचा गैरफायदा घेत तरुणीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना भोसरी परिसरात उघड झाली आहे. याप्रकरणी एका 24 वर्षीय तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दीपक आत्माराम शेडगे (वय 32, रा. नारायण हौसिंग सोसायटी, भोसरी) अशी तक्रार झालेल्या तरूणाचे नाव आहे. भोसरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक व संबंधित पीडीत तरुणी हे एकमेकांना ओळखात. पुढे दीपकला ही मुलगी आवडू लागली. त्यामुळे त्याने तिला प्रपोज केले व मला तुझ्याशी लग्न करायचे असल्याचे सांगितले. दोन दिवसापूर्वी घरी कोणी नसताना दीपकने तरुणीला घरच्यांची ओळख करून देण्याच्या बहाण्याने घरी बोलावले. त्यावेळी दीपकच्या घरात त्याच्याशिवाय कोणीच नव्हते. यावेळी तिने विचारपूस केली असता त्याने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने विरोध करताच दीपकने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दीपकने तिच्यावर बलात्कार केला. बुधवारी दुपारी भोसरी पोलिसांनी आरोपी दीपकला अटक केली. पुढील तपास भोसरी पोलिस करीत आहेत.