आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीराज चव्हाण हे स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री- माणिकराव ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे स्वच्छ प्रतिमेचे असून त्यांचा कारभार ही पारदर्शक होता. त्यांच्या कारकीर्दित त्यांच्यावर घोटाळ्यांचा कोणताही आरोप झाला नाही. महाराष्ट्रात सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळणार असून काँग्रेस पक्षच सत्ता स्थापण करणार असल्याचा विश्‍वास कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला.

पिंपरी मतदारसंघाचे उमेदवार मनोज कांबळे यांच्या प्रचार कार्यालयाला प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी धावती भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष सचिन साठे, विनोद नढे, कविचंद भाट आदी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले की, पिंपरीमध्ये काँगेसकडून मनोज कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. युवकांच्या विकासकरण्यासाठी ते पुरेपुर प्रयत्न करतील. पिंपरी-चिंचवड शहरातील युवकांना रोजगार उपलब्ध करुण देण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहिल. पिंपरी मतदार संघाचा विकास करण्यासाठी मनोज काबळे यांना निवडुण द्या असेही आवाहन ठाकरे यांनी केले. दापोडी, कासारवाडी, खराळवाडी, मोरवाडी, निगडी, आकुर्डी, प्राधिकरण, चिंचवड स्टेशन, मोहननगर, पिंपरी परिसरात झालेल्या प्रचार फेरीचा त्यांनी आढावा घेवून पुढील प्रचाराबाबत त्यांनी सूचना केल्या.