आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकचा कांगावा गांभीर्याने घेत नाही, संरक्षणमंत्री पर्रीकर यांची पुण्यात प्रतिक्रिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - भारताकडून पाकिस्तानात दहशतवादी हल्ले घडवले जात असल्याचा पाकिस्तान सरकारचा कांगावा मी गांभीर्याने घेत नाही. पाकिस्तानची अाेरड म्हणजे रेवडीला गंडेरीची साक्ष अशा काेकणी म्हणीसारखी असल्याची खाेचक प्रतिक्रिया संरक्षणमंत्री मनाेहर पर्रीकर यांनी शनिवारी राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनीच्या (एनडीए) १२८ व्या तुकडीच्या दीक्षांत समाराेहानंतर पत्रकारांशी बाेलताना दिली.

दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी दहशतवाद्यांचा वापर करण्यात गैर काय, असे विधान काही दिवसांपूर्वी पर्रीकर यांनी केले हाेते. त्याची गंभीर दखल घेत पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने भारताकडून दहशतवादी कारवायांना खतपाणी घातले जात असल्याचा कांगावा सुरू केला. याबाबत पर्रीकरांना पत्रकारांनी विचारणा केली असता, त्यांनी अशा प्रकारे पाकिस्तानच्या कांगाव्याला विराेध दर्शवला. सैन्यदलातील अधिकाऱ्यांच्या कमतरतेबाबत पर्रीकर म्हणाले, दरवर्षी निवृत्त हाेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे रिक्त जागांची पाेकळी निर्माण झाली असून ती भरून काढली जाईल. त्यासाठीच प्रस्ताव तयार करण्यात अाला असून त्यास संमती दिली जाईल. सैन्यदलातील विविध विभागांत महिलांची संख्या लक्षणीय असून त्यात वाढ करण्यात येईल. परंतु महिला अधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र हे फक्त कार्यालयीन कामापुरतेच मर्यादित राहील. प्रत्यक्ष रणभूमीत महिला अधिकाऱ्यांना स्थान िदले जाणार नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
एनडीएत १४ परदेशी विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त
एनडीएच्या १२८ व्या तुकडीत ४०१ विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली असून यामध्ये भूतानचे अाठ, अफगाणिस्तानचे पाच व एक मालदीवचा अशा १४ परदेशी विद्यार्थ्यांचा समावेश अाहे. या वेळी विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन व चित्तथरारक हवाई कसरती पाहून उपस्थितांच्या डाेळ्याचे पारणे फिटले. सुवर्णपदकप्राप्त बिहारचा अभिषेककुमार सिन्हा प्रतिक्रिया देताना म्हणाला, एनडीएतील तीन वर्षे मी कधीही विसरणार नाही. माझे वडील निवृत्त लष्करी अधिकारी असून त्यांच्या प्रेरणेने मी लष्करात दाखल झालाे.
एनडीएची प्रवेश क्षमता वाढवणार
एनडीएतील विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता वाढवण्यात येणार असल्याचे सांगताना पर्रीकर म्हणाले, सध्या एनडीएत १९५० छात्र शिक्षण घेत असून ही संख्या २४०० पर्यंत नेण्यात येईल. या प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी मिळालेली अाहे. एनडीएत प्रवेश घेण्यासाठी देशभरातील विद्यार्थी उत्सुक असतात. परंतु मर्यादित प्रवेश क्षमतेमुळे अनेक विद्यार्थ्यांना संधी मिळत नाही. एनडीएची प्रवेश क्षमता वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रवेश क्षमतेत ४५० जागा वाढवण्यात अाल्या अाहेत.
बातम्या आणखी आहेत...