आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mansoon Active; Marathwada Its Strength Decrease

मान्सूनचा जोर कायम;मराठवाड्यात तुरळक पाऊस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - महाराष्‍ट्र व्यापलेल्या मान्सूनच्या पावसाचा जोर कोकणात मंगळवारीही कायम राहिला. मध्य महाराष्‍ट्रआणि विदर्भ-मराठवाड्याच्या काही भागांत दमदार पावसाने हजेरी लावली. येत्या चोवीस तासांत कोकण किना-यावर अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्‍ट्रव मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे.


‘अरबी समुद्रात दक्षिण गुजरातपासून कर्नाटकपर्यंतच्या किनारपट्टीवर सोमवारी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव अजूनही कायम आहे. कोकण किनारपट्टीवरील चक्राकार वा-यांची गतीही कायम असल्याने पुढील 48 तासांत कोकण, मध्य महाराष्‍ट्रात मान्सून सक्रिय राहणार आहे,’ असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तुलनेने विदर्भ आणि उत्तर महाराष्‍ट्रात अजूनही पावसाचा जोर नाही. पश्चिम महाराष्‍ट्रातल्या पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यांमध्येही पाऊस कमी आहे.


गेल्या 24 तासांतील पाऊस
गंगापूर 05 कन्नड 3.5
अंबड 1.9 बीड 4.2
गेवराई 11.2 लातुर 02
उस्मानाबाद 19.1 नांदेड 8.8