आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mansoon Arrived, Coveres Kerala, Entering Karnataka

मान्सूनचे आगमन; केरळ व्यापला, कर्नाटकमध्ये प्रवेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मान्सून शनिवारी केरळमध्ये दाखल झाला. दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप-मालदीव बेटांवरून पुढे सरसावलेल्या मान्सूनने शनिवारी संपूर्ण केरळचे आकाश व्यापून टाकले. केरळ ओलांडून मोसमी पाऊस कर्नाटकच्या सीमेवर दाखल झाला असून पुढील वाटचालीसाठी अनुकूल हवामानस्थिती असल्याचे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.


दरवर्षी सहा जूनच्या सुमारास तळकोकणात मान्सून दाखल होतो. याच वेगाने मान्सूनची आगेकूच होत राहिली तर 7 जूनपूर्वी महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. केरळातून पुढे सरकलेला मान्सून दक्षिण कर्नाटकतील मंगळुरू, म्हैसूर, सेलमपर्यंत दाखल झाला आहे. 3 जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होईल, असा हवामानखात्याचा अंदाज होता. दरम्यान, दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी शनिवारी मुसळधार पाऊस झाला. कन्नुर जिल्ह्यात 290 मिलिमीटर तर एर्नाकुलम, कोची, थिरुवनंतपुरम आदी जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी शंभर मिलिमीटरचा आकडा ओलांडला. मान्सूनची सक्रियता आगामी काही दिवस कायम राहणार असून पुढच्या 24 तासातही केरळच्या सर्व भागात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वेशाळेने व्यक्त केला आहे.


महाराष्‍ट्रातही मान्सूनपूर्व पाऊस
राज्यात अनेक ठिकाणी शनिवारी मान्सूनपूर्व पाऊस झाला. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्हा, हिंगोली शहर तसेच जालना जिल्ह्यातील काही भागांत सरी कोसळल्या. कोकणातील काही भाग तसेच कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाची नोंद झाली. येत्या चोवीस तासांत तुरळक सरी पडतील, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.


पाऊस कुठपर्यंत?
कर्नाटकातील मंगळुरू येथून महाराष्ट्रातील
प्रमुख शहरांचे हवाई
अंतर पुढीलप्रमाणे :
औरंगाबाद : 777 कि.मी.
नाशिक : 796 कि.मी.
जळगाव : 905 कि.मी.
सोलापूर : 543 कि.मी.
नगर : 688 कि.मी.