आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सूनचा प्रवास मंदावल्याने पावसाचा जोर ओसरला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - नैर्ऋत्य मोसमी पावसाचा (मान्सून) राज्यातला जोर ओसरला आहे. गेल्या 24 तासात विदर्भात मान्सून सक्रिय झाला. कोकणात सर्वत्र झाला असला तरी 50 मिमीपेक्षा अधिक पाऊस कुठेच झाला नाही. विदर्भातही सर्वदूर असला तरी मध्यम स्वरूपाचा झाला. उर्वरित राज्यातही प्रमाण कमीच राहिले. संपूर्ण राज्य मान्सूनने व्यापल्याने कोठेही पारा 40 अंशांच्या पुढे गेला नाही. ढगाळ, पावसाळी हवेमुळे बहुतांश शहरांचे तापमान 35 अंशांच्या आत आले आहे. येत्या 24 तासांत कोकणात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाडा-मध्य महाराष्‍ट्रात काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. दरम्यान, उत्तरेकडे सुरू असलेला मान्सूनचा प्रवासदेखील बुधवारी मंदावला.


गेल्या 24 तासांतील नोंद
जालना 4.9
घनसावंगी 2.9
बीड 1.8
अंबाजोगाई 2.8
परळी 7.8
लातूर 5.2
चाकूर 13
उमरगा 04
नांदेड 4.6
देगलूर 10.2
गंगाखेड 04
हिंगोली 7.1