आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांच्‍या बारामतीत एकवटले लाखो मराठा बांधव, पाहा अशी झाली विक्रमी गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ड्रोन कॅमे-यातून उपस्‍थितांचे असे चित्र दिसत होते. - Divya Marathi
ड्रोन कॅमे-यातून उपस्‍थितांचे असे चित्र दिसत होते.
बारामती- सकल मराठा समाजाच्‍या वतीने आपल्‍या विविध मागण्‍यांसाठी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्‍या बारामतीमध्‍ये मूक मोर्चा काढण्‍यात आला. सकाळपासूनच मराठा समाजबांधवांनी या मोर्चासाठी गर्दी केली होती. कसबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरूवात होणार असल्‍याने हा चौक गर्दीने फुलून गेला होता.
कोपर्डी प्रकरणातील्या दोषींना फाशीची शिक्षा द्या, मराठ्यांना आरक्षण द्या, आणि अॅट्रोसिटी कायद्यात सुधारणा करा आदी प्रमुख मागण्‍यांसाठी राज्‍यात मराठा समाजाच्‍या वतीने मोर्चे काढण्‍यात येत आहेत. काल धुळ्यात झालेल्‍या मोर्चातही लाखो समाजबांधवांची उपस्‍थिती होती. बारामतीमधील मोर्चालाही लाखो समाजबांधवांनी गर्दी केली होती. शहरात होणारी गर्दी लक्षात घेता ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्‍त होता, शिवाय 2500 स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते.
ज्‍या शहरातील मराठा मोर्चाचेे फोटो पाहायचे त्‍या बॉक्‍समध्‍ये क्‍लिक करा.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, बारामतीमधील मोर्चातील फोटो..
बातम्या आणखी आहेत...