आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती मोर्चा : कसे पोहचाल मुंबईला, पोलिसांनी काय केलंय आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मराठा मूक मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे आणि जुन्या महामार्गावरून दुपारपासूनच वाहनांची लगबग वाढली आहे. वाहनांची मोठ्या प्रमाणावरील संख्या लक्षात घेऊन येत्या दोन दिवसांत मुंबईसह सोलापूर, सातारा आणि नगर महामार्गावरील प्रवास शक्यतो टाळावा, असे आवाहन शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.
 
सोलापूर रस्त्याने येणारी वाहने हडपसर गाडीतळ-कोंढवा-कात्रज बासपास-बेंगळुरू महामार्गावरून मुंबईकडे जातील. साताऱ्याकडून येणारी वाहने बेंगळुरू महामार्गाने मुंबईकडे जातील. नगर रस्त्याने चाकणमार्गे न गेलेली वाहने शहरात येऊऩ वाघोली, येरवडा होळकरपूल, बोपोडीमार्गे मुंबईला जातील. मोर्चानंतर  परतीचा प्रवासही त्यांचा याच मार्गाने होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या सर्व मार्गांवर वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे. पोलिसांनी यासाठी तयारी केली असली तरी अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...